आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हयासाठी देणार १२ जंबो ऑक्सिजन सिलेंडर

आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हयासाठी देणार १२ जंबो ऑक्सिजन सिलेंडर

कोरोना अँटीजन टेस्टसाठीही देणार १ हजार किट्स; ट्विट करून दिली माहिती

कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडूनये यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंबर कसली आहे.जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना १२ जंबो ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कोरोना टेस्ट करण्यासाठी १ हजार अँटीजन किट्स देणार आहे.तशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी ट्विटर करून केली आहे.ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात आमदार नितेश राणे यांनी मदतीचा दिलेला हात रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता असल्याने आमदार नितेश राणे यांनी या आधी १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयला पाठवले. ज्याच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना फायदा होत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याच्या घटना राज्यात रोज घडत असून, अशी वेळ सिंधुदुर्गातील रुग्णांवर येऊ नये यासाठी येत्या दिवसांत आणखी जंबो सिलेंडर सिंधुदुर्गासाठी पाठवणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या मदतीमुळे नक्कीच अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा