जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन किटचा तुटवडा

जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन किटचा तुटवडा

सरसकट रॅपिड टेस्टच्या आग्रहामुळे किट संपल्याचा आरोग्य विभागाच्या सूत्रांची माहिती

कणकवली

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट ची किट संपल्याची बाब समोर आली आहे. कणकवली पटवर्धन चौकासह खारेपाटण चेकपोस्टवर देखील या किटचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रॅपिड टेस्ट करण्यास आरोग्य विभागाला मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडे रॅपिड कीट मागणी करण्यात आली असून, अद्याप किट चा पुरवठा झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच याबाबत आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वांचीच रॅपिड टेस्ट करण्याचा आग्रह धरल्याने आता गरजे वेळी रॅपिड कीट चा तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात आले. खरेपाटण चेक पोस्ट वरून जिल्ह्यात येणाऱ्या लक्षणे असणाऱ्या लोकांची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यातच अनेक ठिकाणी शहरांमध्ये रॅपिड टेस्ट साठी पथके तैनात करण्यात आली असून, तेथे देखील रॅपिड किटचा भासणारा तुटवडा तातडीने दूर करण्याची मागणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आय सी एम आर च्या मार्गदर्शक तत्वानुसार लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे असते. तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या किंवा अन्य गंभीर रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यासाठी रॅपिड किट शिल्लक ठेवणे गरजेचे असते. मात्र सरसकट रॅपिड टेस्ट चा आग्रह धरल्यामुळे आता हा तुटवडा भासू लागला असून, तालुका स्तरावरुन जिल्हास्तरावर रॅपिड किटचा मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रॅपिड कीट संपल्याने आता ही कीट केव्हा उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा