You are currently viewing फोंडाघाट मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने व्यापारी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

फोंडाघाट मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने व्यापारी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी घेतला आढावा

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी येऊन सर्व व्यापारी हवालदिल झाले आहेत शेतीचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज झालेल्या पावसामुळे फोंडाघाट मधील दोन्ही नद्यांना पूरसदृश पाणी झाल्याने फोंडाघाट एसटी स्टँडवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या सर्व गोष्टींचा फिल्डवर जाऊन आढावा घेतला आहे. या सर्व समस्यांचे निवेदन ते आमदारांना सादर करणार आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =