जिल्हाधिकाऱ्यांची बदलीची ‘फेक’ ऑर्डर काढणाऱ्यांची सायबर सेलमार्फत चौकशी करा..

जिल्हाधिकाऱ्यांची बदलीची ‘फेक’ ऑर्डर काढणाऱ्यांची सायबर सेलमार्फत चौकशी करा..

दोषीवर गुन्हे दाखल करा; सावंतवाडी मनसेची मागणी

सावंतवाडी
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली असल्याचे खोटे आदेश सोशल मीडियावर टाकणाऱ्या व्यक्तीची सायबर सेल मार्फत चौकशी करून त्याचा शोध घ्यावा आणि शासनाची व प्रशासनाची बदनामी करणाऱ्या त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे कडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत युवतीअध्यक्ष ललिता नाईक सचिव आकाश परब सहसचिव कृष्णा गावडे अनुप सोनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा