पालकमंत्र्यांनी लसीकरणाबाबतचा गोंधळ तातडीने थांबवावा…..

पालकमंत्र्यांनी लसीकरणाबाबतचा गोंधळ तातडीने थांबवावा…..

ॲड. नकुल पार्सेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या लसिकरणाबाबत उलटसुलट निर्णय घेऊन आणि तशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करुन मुळातच भयभीत असलेल्या नागरिकांना आणखीन मानसिक त्रास होत असून याबाबत मा.पालकमंत्री व जिल्हाधिकारी यानीं लसिकरणाबाबतच्या नियोजना बाबत जातीने लक्ष घालून हा चाललेला गोंधळ तातडीने दुर करावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते एँड.नकुल पार्सेकर यांनी केली आहे.
वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना आँनलाईन नोंदणी करुन लसीचा पहिला डोस देण्याबाबतचे नियोजन करून त्याची प्रशासनाने व मा.पालकमंत्र्यांनी घोषणाही केली.ज्या पोर्टलवर ही नोंदणी करायची होती त्यावर नोंदणी होताना नोंदणी करणाऱ्यांना फार मोठी कसरत करावी लागत आहे.सिंधुदुर्गातील या वयोगटातील असंख्य लोकांनी आँनलाईन नोंदणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.सावंतवाडीतील एका पंचवीस वर्षीय युवतीने रात्र रात्र जागून दिनांक १मे रोजी नोंदणी केली.तिला आयडी क्रमांकही मिळाला.तीन मे रोजी तिने आँनलाईन लसिकरण केंद्राचा पर्याय शोधला तर फक्त शिरोडा प्राथमिक केंद्राचा पर्याय होता.लस घ्यायलाच पाहिजे म्हणून तो पर्याय निवडला.त्या युवतीला शिरोडा येथे दिना़क १४मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत लस घेण्यासाठी यावे असा संदेश आला.आपल्याला लस मिळणार या आनंदात असतानाच आज तिला असा मेसेज आला कि,आम्ही आपणास लस देवू शकत नाही, याबद्दल क्षमस्व.. आपण पुन्हा नोंदणी करा.
मात्र आजच्या सगळ्याच मिडियामध्ये सदर वयोगटातील नागरिकांना आजपासून लसीकरण सुरु असून सुमारे पाच हजार डोस आल्याची बातमी प्रसिद्ध झालेली आहे.नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही असे जाहीर केल्याने अनेकांनी रात्र रात्र जागून नोंदणी केली तसेच आपल्या गावापासून लांब ठिकाणीही लस घेण्याची तयारी दाखवली तरीही या नियोजनाच्या गोंधळामुळे लस मिळत नाही. हे दुर्दैव आहे.
ज्या जेष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यांना ४५दिवसानंतर दुसरा डोस मिळेल की नाही याची चिंताही त्याना भेडसावत आहे.लसीचा तुटवडा असेल तर अशा पोकळ घोषणा करून कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्याना आणखीन मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास होत आहे.याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयात जातीनीशी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी श्री पार्सेकर यानी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा