सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी

– अमित सामंत,  जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यतत्पर तसेच कोवीड 19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर सर्वाना विश्वासात घेऊन काम करणारे सिंधूदूर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची बदली झाल्याची बातमी व्हाॅटसॲपवरून प्रसारित करून जिल्ह्य़ात कालपासून अफवा पसरवली जात आहे. या बातमी मागे जिल्ह्य़ातील महसूलचाच एक बडा अधिकारी व त्याला सहकार्य करणार्‍या महसुलच्याच काही अधिकार्‍यांचा हा कट असून त्या अनुषंगाने राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्या कडे तक्रार करणार असून ज्या सरिता बांदेकर –देशमुख उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने बदलीची खोटी ऑर्डर तयार करून जिल्ह्य़ात हलकल्लोळ माजवला या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर गुन्हे शाखे मार्फत तातडीने चौकशी करून दोषींना जनतेसमोर आणून संबंधितांवर कारवाई करावी.

ज्या अधिकार्‍यांच्या नावाने ऑर्डर तयार केली आहे त्या अधिकार्‍यांची सहा महिन्यांपूर्वीच अन्यत्र बदली झाली आहे. त्यामुळे या बोगस बदली ऑर्डर मागे महसुलच्याच एका बड्या अधिकार्‍यांसह एक रॅकेट आहे ते लवकरच शोधून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सांगून हे प्रकरण तडीस लावण्यासाठी पाठपुरावा करतच राहाणार.

कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक कारभाराचा वचपा काढण्यासाठीच हा खटाटॊप. प्रकरणाची सायबर गुन्हा शाखे मार्फत चौकशी व्हावी

नॅशनल हायवे भूसंपादन प्रक्रियेतील महसुलच्या काही अधिकार्‍यांचा रोल असण्याची दाट शक्यता. या अनुषंगानेच तपास पोलीस अधीक्षकांनी करावा. नॅशनल हायवे क्रमांक ६६ च्या भूसंपादन प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी लाभधारकांच्या तसेच जनतेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. त्या प्रकरणाचा तपासाकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीने दिलेला चौकशी अहवाल हा संबंधित अधिकाऱ्यांना क्लिन चिट देणारा होता. आणि तो जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. आणि सदरच्या प्रकरणाची आयुक्त स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी केली होती,आणि आयुक्त स्तरावरून समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आपले बिंग फुटेल याची भिती असण्याचीच दाट शक्यता आहे. हाच केंद्रबिंदू मानून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर गुन्हे शाखे मार्फत तातडीने चौकशी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी राज्याचे गृहमंत्री ना.श्री.दिलीप वळसे पाटील व पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले .

प्रतिक्रिया व्यक्त करा