You are currently viewing सिंधुदुर्गात तात्काळ “प्लाझ्मा डोनेट” मशीन उपलब्ध करून द्या – देव्या सुर्याजी

सिंधुदुर्गात तात्काळ “प्लाझ्मा डोनेट” मशीन उपलब्ध करून द्या – देव्या सुर्याजी

युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून केले प्रशासनाला आवाहन…

सावंतवाडी

कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या “प्लाझ्मा डोनेट” करण्याची मशीन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल थांबतील, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केली आहे.
दरम्यान रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. यात प्रचंड वेळ वाया जात असून रूग्णांची गैरसोय होत आहे. वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्ण दगावत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्लाझ्मा डोनेट करण्याचे मशिन सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून द्याव, अन्यथा कुडाळ येथील महिला रूग्णालयात मंजूर झालेल्या नव्या रक्तपेढीत उपलब्ध करून द्या,अशी मागणी श्री सुर्याजी यांनी केली आहे. जेणेकरून मशीनविना रुग्णांच्या नातेवाईकांचे, प्लाझ्मा डोनरचे होणारे हाल थांबतील, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचीही सोय होईल व अनेकांचे जीव वाचतील. तर आजच्या परिस्थितीत प्लाझमादाते उपलब्ध करण कठीण बनल असून त्यासाठी जिल्ह्यातील रक्तदाता पुढाकार घेत आहे अस मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 8 =