सोनुर्लीत कृषी विभागाने उभारलेले बंधारे फुटले…

सोनुर्लीत कृषी विभागाने उभारलेले बंधारे फुटले…

निकृष्ट दर्जाचे काम; चौकशी करण्याची बाबू सावंतांची मागणी…

सावंतवाडी

सोनुर्ली गावात कृषी विभागाच्यावतीने हजारो रूपये खर्च करून उभारण्यात आलेले बंधारे फुटले आहेत.बंधा-यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप आहे या बंधाऱ्यांची मोडतोड झाली असून या कामाची चौकशी करण्यात यावी,अन्यथा आपण आंदोलन करू,असा इशारा वजा आरोप पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बापू सावंत यांनी केला आहे.दरम्यान या कामाची तात्काळ चौकशी करावी व संबंधित बंधारे पूर्ववत करून देण्यात यावेत,असे त्यांनी म्हटले आहे.
कृषी विभागाच्या वतीने पाणी अडविण्यासाठी बंधारे घालण्यात आले होते.मात्र पाणी अडवणी सोडाच काही दिवसातच हे बंधारे फुटले आहेत.त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा