समर्पण

समर्पण

किती हसशील, किती लाजशील
मनात तुझंच घर करून राहशील..

वेड्या आशा तुझ्या वेड्या अपेक्षा,
वेड्यासारख्याच तुला छळत राहतील.

सुखात हसत आनंद उधळशील,
भाबड्या चेहऱ्याआड दुःख लपवशील.

निष्पाप निर्मळ मन तुझं हळवं,
भरल्या डोळ्यांत आसवं गोठवशील.

समर्पण तुझ्या नसानसात भिनलेलं,
अगदी हसत हसत सर्वस्व बहाल करशील.

नसे तुला चिंता तुझ्या उद्याच्या भविष्याची,
राखेतून झेप कशी घ्यावी हे तूच शिकवशील.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा