शामल मांजरेकर यांना राष्ट्रीय दर्पणकार आदर्श शिक्षक सम्राट पुरस्कार जाहीर…

शामल मांजरेकर यांना राष्ट्रीय दर्पणकार आदर्श शिक्षक सम्राट पुरस्कार जाहीर…

सुरंगपाणी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका…

वेंगुर्ले प्रातिनिधी 

वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगपाणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. शामल शंकर मांजरेकर-पिळणकर यांची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ,नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दर्पणकार आदर्श शिक्षक सम्राट पुरस्कार २०२० साठी निवड झाली आहे.
संघाचे राज्य अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी सौ. शामल मांजरेकर यांना निवडपत्राद्वारे कळविले आहे. लवकरच शासनाची परवानगी घेऊन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सौ.शामल मांजरेकर यांनी लॉकडाऊनच्या काळात वैविध्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले असून सातत्याने लेख,कविता व ऑनलाईन व्याख्याने आयोजित करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. सौ.मांजरेकर यांनी अनेक ऑनलाईन काव्य, कथाकथन स्पर्धांमध्ये सहभागी होत घवघवित यश संपादन केले आहे. सौ.शामल मांजरेकर यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक व सामाजिक स्तरावर अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा