शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांचे सायंकाळी निधन

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांचे सायंकाळी निधन

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे कोंडस्करवाडी येथील रहिवासी तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि वेंगुर्ला पंचायत समिती माजी उपसभापती आबा कोंडस्कर यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर ओरोस येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मावळली.

जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होती. वेंगुर्ला तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. आगामी जि प व पंचायत समिती निवडणुकीसाठी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे ते प्रबळ दावेदार होते. युवकांमध्येही त्यांचा मोठा संपर्क होता. क्रीडा स्पर्धा, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ते नेहमीच अग्रेसर असत. कोंडस्कर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाची भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे युवसेनेमार्फत भव्य यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने शिवसेना पक्षाचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या या निधनाने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा