You are currently viewing कुडाळ शहारातील भला मोठा वृक्ष तोडण्यास भाजपा चा विरोध

कुडाळ शहारातील भला मोठा वृक्ष तोडण्यास भाजपा चा विरोध

 

कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौकात असलेले वडाचे भलेमोठे झाड तोडण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. मात्र हे झाड तोडण्यात येऊ नये,तसे झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,असा इशारा वसुंधरा दिनाच्या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

आज या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरपंचायत गटनेते विलास कुडाळकर, निलेश परब, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे, ॲड. राजीव कुडाळकर, देवेंद्र नाईक, चांदणी कांबळी आदी पदधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा