You are currently viewing स्वार्थासाठी ‘लोंबतेगीरी’ करणार्‍यांनी आपली बडबड थांबवावी- तारकर्ली शाखाध्यक्ष प्रतीक कुबल

स्वार्थासाठी ‘लोंबतेगीरी’ करणार्‍यांनी आपली बडबड थांबवावी- तारकर्ली शाखाध्यक्ष प्रतीक कुबल

पाहणी दौरे करत फोटो काढून आरोग्याचे प्रश्न मिटत नाहीत; लोकप्रतिनिधींना जनतेचा आक्रोश ऐकवा

कुडाळ शिवसेना शहरअध्यक्षांना मनसेचा पलटवार

मालवण

अपयशी आणि सुस्त लोकप्रतिनिधींमुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. कालपर्यंत जिल्ह्यात ३१९ कोव्हिड रुग्णांचा जीव गेला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. जनतेसमोर खरी वस्तुस्थिती आकडेवारीसहीत मनसे मांडत आहे. म्हणूनच स्वार्थासाठी लोंबतेगीरी करणार्‍या शिवसेनेचे कुडाळ शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांनी आपली बडबड प्रसारमाध्यमात वेळीच थांबवावी आणि आपल्या ‘सुस्त’ लोकप्रतिनिधींना जनतेचा आक्रोश ऐकवावा असा जोरदार पलटवार मनसेचे तारकर्ली शाखाध्यक्ष प्रतीक कुबल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात कुबल पुढे म्हणतात की चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केल्यामुळे लोकांचा जीव जात आहे. नवीन कोव्हिड रुग्णांसाठी तसेच नवीन लसीकरणासाठी नियोजन नाही. सत्ताधार्‍यांच्या चुका वेळीच दाखवण्याचा अधिकार लोकशाहीत विरोधी पक्षाला आहे हे कदाचित संतोष शिरसाट यांना माहीत नसावे. कारण त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी जीजी उपरकर, सुरेश प्रभु, त्यानंतर नारायण राणें अश्या बेडूकउड्या मारल्या. आता वैभव नाईकांकडे बस्तान बसवले आहे.
त्यामुळे अश्या लोंबतेगिरी करणार्‍या शिरसाटांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांवर टीका करण्यापेक्षा मतदार असलेल्या जनतेचा आक्रोश आपल्या लोकप्रतिनिधींना ऐकवावा. वैद्यकीय अहवाल आठ दिवसांनी उशिरा का मिळतो, जिल्ह्यासाठी ॲम्बुलन्स का नाहीत? कधी उपलब्ध होणार?ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड नाहीत म्हणून लोकांना वणवण भटकावे का लागते ? या प्रश्नांची उत्तरे विचारावीत. अन्यथा जर सदर विषय सोडवण्यास तुमचे लोकप्रतिनिधी सक्षम नसतील तर राजीनामे देवून घरी बसण्यास सांगावे असेही कुबल यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 3 =