वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार, कार्यालयीन वेळेत फेऱ्या बंद…

वेंगुर्ले एस्. टी.आगाराचा अनागोंदी कारभार, कार्यालयीन वेळेत फेऱ्या बंद…

तात्काळ फे-या सुरू करा ; अन्यथा आगाराला टाळे ठोकू, भाजपचा इशारा….

वेंगुर्ला

एस्. टी.आगाराचा सद्या अनागोंदी कारभार सुरू आहे. अत्यावशक बस बंद आहेत. ज्याठिकाणी कर्मचारी जास्त आहेत त्याठिकाणी सकाळी कार्यालयात जातेवेळी व संध्याकाळी कार्यालय सुटतेवेळी एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात. कामात सुधारणा करून गाड्या सुरळीत सुरू झाल्या नाहीत तर आगाराला टाळे ठोकू असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने आज गुरुवारी आगारास भेट देऊन निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा