पत्रकार संजय खानविलकर यांना पितृशोक

पत्रकार संजय खानविलकर यांना पितृशोक

तळेरे येथील जेष्ठ व्यापारी अनंत खानविलकर यांचे निधन

तळेरे

तळेरे बाजारपेठेतील जेष्ठ किराणा व्यापारी अनंत शंकर खानविलकर (वय ७८) यांचे गुरुवारी सकाळी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते किराणा व्यावसायीक म्हणून सर्वत्र परिचित होते.अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करीत होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०१३/१४ साली आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्या वतीने दिला जाणारा कै.दत्तात्रय तुकारामशेठ जठार स्मूती यशस्वी उद्योजक पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,सुना,दोन भाऊ,भावजय,बहिणी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.तळेरे येथील पत्रकार व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे सचिव संजय खानविलकर तसेच गिरण व्यावसायिक संतोष खानविलकर यांचे ते वडील होत.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजली वाहण्यात येऊन तळेरे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा