जळालेल्या अवस्थेत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह; घात की अपघात

जळालेल्या अवस्थेत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह; घात की अपघात

कणकवली

तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे 90 % हुन अधिक जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला असून घटनास्थळी डीवायएसपी डॉ.कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भेट दिली.

नरडवे भेर्देवाडी येथे अज्ञाताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. तात्काळ डीवायएसपी डॉ कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला , पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे 30 वर्षे वयाच्या युवकाचा मृतदेह पूर्ण जळालेल्या अवस्थेत होता. पाय आणि पोटाचा काही भाग सोडला तर पूर्ण शरीर जळालेले होते. प्राथमिक पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टेम साठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा