महाराष्ट्राच्या लागून असलेल्या आणखी 2 राज्यात लॉकडाऊनची घोषणा

महाराष्ट्राच्या लागून असलेल्या आणखी 2 राज्यात लॉकडाऊनची घोषणा

 

देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता वेगवेगळ्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. काही ठिकाणी शनिवार व रविवार लॉकडाऊन आणि नाईटकर्फ्यू घोषित केला गेला आहे. गोव्यात बुधवारी लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे. याची घोषणा करीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 29 एप्रिल रोजी गोव्यात संध्याकाळी 7 पासून 3 मे पर्यत लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. यावेळी आवश्यक सेवा आणि औद्योगिक क्रियाकलापांना परवानगी देण्यात आली. या काळात सार्वजनिक वाहतूक बंद राहील. राज्यात कॅसिनो, हॉटेल्स, पब बंद राहतील.

 

दुसरीकडे, गुजरातमध्ये कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने आंशिक लॉकडाऊन जाहीर केले आहे. बुधवारी रात्री 8 पासून 5 मे पर्यंत मेडिलक, डेअर, रेशन दुकान, भाजीपाला वगळता सर्व दुकाने, मॉल, मल्टिप्लेक्स, मंदिरे, गार्डन्स, जिम इत्यादी बंद राहिले. आठ महानगरं आणि 29 शहरांमध्ये ही बंदी असेल. सरकारने विविध समारंभांवर बंदी देखील घातली आहे.

 

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, डॉक्टर आणि विविध संघटनांच्या सल्ल्यानुसार सरकारने 28 एप्रिल ते 5 मे या काळात राज्यात आंशिक लॉकडाऊन जाहीर केले आणि आवश्यक सेवा वगळता या सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा