आ. दिपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची सूचना
स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या वेंगुर्ले खवणे येथील समृद्धी सुमित सावंत, व सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी संजय काशीराम वारंग, व कमलेश सुरेश परब यांचे निधन झाले आहे. या तिन्ही व्यक्तींनी कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कामगिरी केली आहे.त्यांचे कोरोना योद्धा म्हणून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याबाबत आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याशी आज चर्चा केली. व लवकरात लवकर हे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे.