You are currently viewing निधन झालेल्या कोरोना योद्धयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा

निधन झालेल्या कोरोना योद्धयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा

आ. दिपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची सूचना

स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या वेंगुर्ले खवणे येथील समृद्धी सुमित सावंत, व सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी संजय काशीराम वारंग, व कमलेश सुरेश परब यांचे निधन झाले आहे. या तिन्ही व्यक्तींनी कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कामगिरी केली आहे.त्यांचे कोरोना योद्धा म्हणून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याबाबत आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याशी आज चर्चा केली. व लवकरात लवकर हे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 2 =