You are currently viewing सावंतवाडीत कोरोना लसीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी दोनच केंद्रे उपलब्ध …

सावंतवाडीत कोरोना लसीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी दोनच केंद्रे उपलब्ध …

नागरिकांमध्ये संभ्रमावस्था; भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली वैद्यकीय अधीक्षकांची भेट…

सावंतवाडी

कोरोना लसीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तालुक्यात मळेवाड व आंबोली ही दोनच प्राथमिक आरोग्य केंद्रे दाखवली जात आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे,अशी नाराजी भाजपाचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान लसीकरणासाठीचे योग्य नियोजन करण्यात यावे,जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.रुग्णालयातील लसीचा तुटवडा व ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी डॉ.पाटील यांची भेट घेतली.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.पाटील म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी शहरातील नागरिकांना प्राधान्य दिले जाणार असून पहिला डोस घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनच आवश्यक आहे.तर सकाळी ९:०० ते दुपारी १:३० या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना,आणि दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत कोरोना योद्ध्यांना लसीकरण केले जाणार आहे. तर ज्या ठिकाणी लसी उपलब्ध आहेत तीच केंद्रे ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी दाखवली जात आहेत.असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी भोसले पॉलिटेक्नीक येथे १०० बेड आहेत.त्यापैकी ६४ बेड शिल्लक आहेत, तर गंभीर रुग्णांसाठी समर्पीत कोव्हिड सेंटर, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय येथे बेड शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 17 =