सिंधुदुर्गनगरी
कणकवली तालुक्यात 15 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. कणकवली शहर – तेलीआळी शांतादूर्गा बिल्डिंग, कणकवली शहर – चौंडेश्वरी प्लाझा, कणकवली शहर – जळकेवाडी, कणकवली शहर – गांगोवाडी, कणकवली शहर – सिध्दार्थनगर , कणकवली शहर – कांबळेगल्ली मारुती मंदिर , फोंडा – नविन वसाहत, वरवडे, बोर्डवे-मधलीवाडी, बावशी – गावठाण,येथे दिनांक 9 मे 2021 पर्यंत,आशिये, खारेपाटण -शिवाजीपेठ येथे दिनांक 7 मे 2021 पर्यंत,बिडवाडी, खारेपाटण- कोंडवाडी , संभाजीनगर – कासारवाडी, दिनांक 8 मे 2021 रोजी पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवलीचे प्रांताधिकारी यांनी दिले आहेत