You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 30 एप्रिल व 1 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

                  शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी दुपारी 2.00 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण येथे लसीकरण केंद्रांची पाहणी, दुपारी 2.45 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डे येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 3.30 वा. उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत जिल्हा कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात आलेल्या उपाययोजनांवरील खर्च, लसीकरण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा, सायं. 5.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे पत्रकार परिषद, सोईनुसार ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, रात्री सोईनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव.

                  शनिवार दि. 1 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थिती, सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने महिला रुग्णालय, कुडाळकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. ग्रामिण रुग्णालय, कुडाळ येथे लसीकरण केंद्राची पाहणी, सकाळी 10.30 वा. कुडाळ येथून मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 12.00 वा. सावंतवाडी येथून मोटारीने दोडामार्गकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. ग्रामिण रुग्णालय, दोडामार्ग येथे लसीकरण केंद्राची पाहणी, दुपारी 1.30 ते 2.00 वा. राखीव. दुपारी 2.00 वा. दोडामार्ग येथून मोटारीने गोवा विमानतळ, दाभोलीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा