You are currently viewing जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी जाणून घेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया

जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी जाणून घेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया

वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

कणकवली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून कोरोना काळात उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सुरू केला आहे. या माध्यमातून फ्रंट लाईनला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या व कोविड रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व भेडसावत असलेल्या समस्यांबाबत संजना सावंत यांनी आढावा घेतला.

सोमवारी त्यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या भेटीच्या वेळी लसीकरणाबाबत होत असलेले रजिस्टेशन व झालेले लसीकरण. लसीकरणानंतर लोकांच्या प्रतिक्रिया याबाबत माहिती घेतली. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील नियमित रुग्ण तपासणी मोठ्या प्रमाणात होत असून, दिवसेदिवस ग्रामीण भागातील लोकांना तपासणीचा फायदा होत आहे. याबद्दल अध्यक्षा संजना सावंत यांनी येथील कार्यरत असलेले डॉक्टर चोपडे, डॉक्टर रूपाली वळंजू , सहकारी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सदर भेटीवेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ हे देखील उपस्थित होते.आरोग्य विषयात काम करत असताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याच्या सूचना अध्यक्षा संजना सावंत यांनी कार्यरत कर्मचारी यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =