ओटवणे कोविड प्रतिबंधात्मक क्षेत्रात जंतुनाशक फवारणी..

ओटवणे कोविड प्रतिबंधात्मक क्षेत्रात जंतुनाशक फवारणी..

संजू विर्नोडकर मित्रमंडळाचे सहकार्य

सावंतवाडी

ओटवणे ग्रामपंचायत आणि संजू विर्नोडकर यांच्या संयुक्त माध्यमातून ओटवणे येथिल कोविड प्रतिबंधात्मक क्षेत्रात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील कोविड रुग्णाचे प्रमाण वाढत असल्याने आणि त्यात रुग्ण ही दगावत असल्याने मोठा चिंतेचा विषय ठरत आहे.ओटवणे ग्रामीण भागात एकूण ११ रुग्ण सापडले असून एका रुग्णाला मृत्युला देखील सामोरे जावे लागले.याची ओटवणे सरपंच उत्कर्षा उमेश गांवकर यांनी त्वरित दखल घेत संजू विर्नोडकर यांच्या सहकार्यातुन कोविड पॉझिटिव्ह मिळालेल्या रुग्णाच्या घरी जंतुनाशक फवारणी केली.

संजू विर्नोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यानी कोविडमुळे मृत्यु पावलेल्या रुग्णाच्या घरी देखील तात्काळ रात्री उपस्थित राहून कुटुंबाला धीर देत जंतुनाशक फवारणी केली.

यावेळी सागर मळगावकर, आकाश मराठे, सामाजिक कार्यकर्ते उमेश गांवकर, महेश चव्हाण, मंगेश गांवकर, तुषार बांदेकर, संतोष तळेवणेकर, दशरथ शृंगारे, बबन भालेकर, विश्वनाथ बोर्ये, सुधाकर बुराण यांचे सहकार्य लाभले. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः ची काळजी घ्यावी. तसेच कोणतेही आजारपण न लपवता त्याची माहिती आरोग्य उपकेंद्राला द्यावी. असे आवाहन ओटवणे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थाना करण्यात आले.

आपल्या कुटुंबावर आलेल्या असंख्य संकटाना तोंड देत न खचता,रात्री अपरात्री इतरांची काळजी घेणारा “कोविड योद्धा” म्हणजे संजू विर्नोडकर असे कौतुक सरपंच उत्कर्षा गांवकर व स्थानिक ग्रामस्थानी केले. गेल्या वर्षभरात ओटवणे येथे तब्बल तीन वेळा त्यांनी जंतुनाशक फवारणी करून गाव सुरक्षित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा