कर्मचाऱ्यांची करण्यात आली मोफत चहा,नाश्ता, जेवणाची सोय

कर्मचाऱ्यांची करण्यात आली मोफत चहा,नाश्ता, जेवणाची सोय

खारेपाटण

खारेपाटण येथे कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशनने बाजारपेठ बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार केला आहे.त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण गावाने व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व आस्थापना बंद ठेवून कडक लॉकडाऊन पाळला आहे.
खारेपाटण गावात कडकडीत बंद सुरू असल्यामुळे खारेपाटण चेकपोस्ट वरील बंदोबस्ताला तैनात पोलीस, महसूल, आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता, पाणी, जेवण याची गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून खारेपाटणमधील हॉटेल NH66 तर्फे खारेपाटण चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस, महसूल व आरोग्य पथकाला सकाळी नाश्ता, दोन वेळ चहा व दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येत आहे. २२ एप्रिलपासून ३० एप्रिल पर्यंत खारेपाटण गावात कडकडीत बंद आहे. या पूर्ण कालावधीत NH 66 हॉटेलच्या वतीने ही सेवा दिली जाणार आहे.
या सेवेबद्दल कर्तव्यावरील पोलीस, महसूल, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने हॉटेल मालक अक्षय जाधव व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा