बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिले कोविड सेंटर

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिले कोविड सेंटर

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे असलेल्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था शैक्षणिक ज्ञानदानाचे काम करत असताना सामाजिक उपक्रमांमध्ये सामजिक बांधिलकी जपत नेहमीच अग्रेसर असते. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संदर्भात त्यांची सजगता वेळोवेळी दिसून आलेली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फार मोठी मदत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी वाढतच चाललेल्या कोरोना या महामारी मध्ये सुद्धा आपल्या परीने सरकारला सहकार्य, समाजाला मदत करण्याचे संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी आपल्या सहकारी स्टाफ च्या मदतीने ठरविले आहे. त्यासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे शैक्षणिक इमारतीचा काही भाग कोविड सेंटर साठी सर्व सोयींनीयुक्त करून शासनास मदत देण्याचे ठरविले आहे.‌

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर यांनी आपल्या नर्सिंग आणि फिजिओथेरपी कॉलेजमध्ये पन्नास बेडचे मोफत कोवीड केअर सेंटर सुरु करण्याचे ठरवीले आहे. युद्ध पातळीवर या केअर सेंटरचे काम चालू आहे. जवळपास तिनशे नर्सिंग विद्यार्थी आळीपाळीने या रुग्णांची सुश्रुषा करणार आहेत. हा उपक्रम रुग्णांसाठी पूर्णतः मोफत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील जे कोवीड रुग्ण अतिगंभीर स्थितीतून बाहेर पडले आहेत पण ते पूर्णतः बरे झालेले नाहीत अशा रुग्णांची सोय या केअर सेंटरमध्ये केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. “सकाळी नाश्त्याला उकड्या तांदळाची पेज आणि कुळथाची पिठी रुग्णाला आम्ही बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे देणार, मनोरंजनासाठी पिक्चर, सिरीयल, अन्य चांगले सकारात्मक कार्यक्रम रुग्णांना दाखविणार आहोत” हे सांगताना उमेश गाळवणकर यांची उमेद, उत्साह विशेषतः जाणवत होता. या केअर सेंटरमध्ये दहा ऑक्सिजन कॉंसंट्रेटेर मशीन लावल्या जाणार आहेत.

ज्यानां या उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल त्यांचे स्वागत. असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी सहकार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा