तुटवडा जाणवत असल्याने, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी…
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात यावा,अशी मागणी भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.दरम्यान आता तरुणाईलाही लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी साडेसात लाखहून अधिक लसींची आवश्यकता आहे त्यामुळे त्याचेही नियोजन योग्य पद्धतीने करावे,असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत लसीचा तुटवडा आहे.या पार्श्वभूमीवर श्री।राणे यांनी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले.