You are currently viewing ई-पास कसा काढायचा? या संबंधीच्या सूचना..

ई-पास कसा काढायचा? या संबंधीच्या सूचना..

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा, तसेच अर्ज भरण्यासाठी काय करावे, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

 *ई-पास कसा काढायचा?* 

▪️  ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा.

▪️ महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा. जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा. तुमचे संपुर्ण नाव नोंद करा.  प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा. मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा. वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा. प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा. आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा. परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा. 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

*ई-पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना*

▪️ शासकीय कर्मचारी/ वैद्यकीय कर्मचारी/ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.

▪️ २१ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांत्सव मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल

▪️पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.

▪️ आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणास्तव ई-पास वितरीत करण्यात येईल.

▪️ अत्यावश्यक सेवा/ शासकीय सेवा/ वैद्यकीय सेवांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासाकरिता ई पास आवश्यक नाही. त्यांना ओळखपत्रांच्या आधारे प्रवासाची मुभा देण्यात येईल.

▪️ मुंबई शहरात प्रवास करण्यास, अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची आवश्यकता नाही.

▪️ सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

▪️अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्र एका फाईलमध्ये एकत्र करा.

▪️फोटोची साईझ २०० केबीपेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्ताऐवजांची साईज ही १mb पेक्षा जास्त नसावी.

▪️ अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा

▪️ संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी आणि मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.

▪️ ई-पासमध्ये तुमचे वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.

▪️प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता त्यांना आपला ई-पास दाखवा किंवा तुम्ही तो प्रिंट करुन वाहनावर चिकटवू शकता.

▪️ ई-पासची डुप्लीकेट प्रत बनवणे. तसेच वैध तारखेनंतर किंवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =