You are currently viewing कोरोना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य नियोजन करा…

कोरोना लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य नियोजन करा…

सावंतवाडी

कोरोना लसीकरणाच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता,आणखीन रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी वाँर्ड व गाव निहाय लसीकरणाचे नियोजन करा, लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा, तसेच दर दिवशी प्रत्येक केंद्रावर लसीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या नावांची यादी आदल्या दिवशी संबंधितांपर्यंत पोहोचवा,अशा सूचना माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी,दोडामार्ग व वेंगुर्ले तालुका प्रशासनाच्या बैठकीत दिल्या.दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरपंचानाही विमा कवच जाहीर करण्यात आले होते.मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.कोरोना काळात सरपंचांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे.त्यामुळे त्यांना विम्याचा लाभ देण्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार,असे आश्वासनही श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.याबाबतचा मुद्दा सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मांडला.
श्री.केसरकर यांनी आज काल झालेल्या बैठकीचा पुन्हा आढावा घेण्यासाठी झूम ॲपच्या माध्यमातून सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका प्रशासनाशी चर्चा केली.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या मागणी संदर्भातील याद्या श्री.केसरकर यांच्याकडे सादर करण्यात आल्या.
यावेळी श्री.केसरकर म्हणाले, कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे.मात्र लसीकरणासाठी होणारी गर्दी सुद्धा आटोक्यात आणणे तेवढेच महत्त्वाचे आहे.त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या प्रशासनाने एकमेकांना विचारात घेऊन योग्य ते नियोजन करावे,एसटी सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून लसीकरणासाठी येणाऱ्यांचे हाल होणार आहेत.त्यामुळे या नियोजनात लसीकरणासाठी येणारऱ्यांना प्रत्येक वाँर्ड व गाव निहाय गाडी ठेवण्यात यावी,जेणेकरून त्यांना होणारा त्रास टाळता येईल,तर गर्दी टाळण्यासाठी दर दिवशी लसीकरण होणाऱ्यांच्या नावांची यादी आदल्या दिवशी जाहीर करण्यात यावी,जेणेकरून अनावश्यक त्या ठिकाणी कोणी रांगेत उभे राहणार नाही, आणि त्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्यांना सुद्धा ताटकळत न राहता,व्यवस्थित बसून लसीकरणाचा लाभ घेता येईल.
श्री.केसरकर पुढे म्हणाले, कालच्या बैठकीत तिनेही तालुक्यांसाठी रुग्णवाहिका व शववाहिकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान ही मागणी येत्या चार-पाच दिवसात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडी मतदार संघातील तीनही तालुक्याला शववाहिका व रुग्णवाहिका दिले जातील तर तीन तालुक्यांमध्ये एक कार्डिओलॉजी रुग्णवाहिका दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आपण प्रशासनाने प्रयत्न करावे,आवश्यक त्या सूचना अथवा मागण्या आपल्या पर्यंत पोहोचवाव्यात, त्यासाठी लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करून देऊ,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा