वेंगुर्लेत विनामास्क फिरणार्‍यांकडे पोलिसांची करडी नजर…

वेंगुर्लेत विनामास्क फिरणार्‍यांकडे पोलिसांची करडी नजर…

दोनशे जणांवर कारवाई : सुमारे ६१ हजार रुपये दंड वसूल…

वेंगुर्ले
कोरोना चे दिवसेंदिवस वाढते रुग्ण लक्षात घेऊन वेंगुर्लेत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत दोनशे जणांवर कारवाई केली असून सुमारे 61 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
मार्च २०२१ ते एप्रिल दि ६ पर्यंतच्या कालावधीत वेंगुर्ले शहरात विनामास्क फिरणाऱ्या २०० जणांवर वेंगुर्ले पोलिसांनी धडक कारवाई करत ६१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये १२७ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर ७३ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये असा एकूण ६१ हजार ९०० रुपये रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, वाहतूक नियंत्रण पोलीस श्री. परुळेकर, श्री. खडपकर, पोलीस हवालदार सचिन सावंत, श्री. दाभोलकर, श्री. पालकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा