You are currently viewing भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर – देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ…

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर – देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ…

वेंगुर्ले
भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायत हद्दीत देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.
अणसुर मध्ये कालच एका व्यक्तीचे कोरोना ने निधन झाल्याने तसेच काही वाड्यांमध्ये कोवीड चे रुग्ण आढळून आल्याने संपुर्ण अणसुर गावात जंतूनाशक फवारणी करण्याचे गावातील युवक मंडळाने ठरविले. त्यासाठी लागणारे जंतूनाशक हे भाजपा मार्फत देण्यात येणार आहे.
आज अणसुर – देऊळवाडी येथे निर्जंतुकीकरणासाठी गावातील आबालवृद्ध उपस्थित होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी निर्जंतुकीकरणासाठी लागणारे जंतूनाशक भाजपा तर्फे मोफत पुरवीले जाईल असे सांगितले. यावेळी तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जेष्ठ देवस्थान मानकरी बाबी गावडे, सामाजिक कार्यकर्ते बीटु गावडे, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे, बुथप्रमुख वामन गावडे, कैलास गावडे, भास्कर गावडे, विशाल गावडे, महेश गावडे, विकास गावडे, कार्तिक गावडे, विजय गावडे इत्यादी सातेरी कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाच्या वतीने गावात जंतूनाशक फवारणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =