You are currently viewing जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी आज देवगड येथे घेतली कोविड विषयक आढावा बैठक

जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी आज देवगड येथे घेतली कोविड विषयक आढावा बैठक

लवकरच देवगड येथे आणखी १०० बेड उपलब्ध होणार

देवगड

जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी यांनी आज देवगड येथे कोविड विषयक आढावा बैठक घेतली. देवगड येथे सुरू होणाऱ्या 100 बेडच्या कोविड सेंटरच्या इमारतीची पाहणी त्यांनी आज केली. ही इमारत तातडीने आरोग्य विभागाच्या ताब्यात द्यावी, अशा सूचना श्रीमती अनिषा दळवी यांनी महसूल विभागाला केले आहेत.

देवगड तालुक्याला ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा कमी आहे तो पुरवठा योग्य प्रमाणात मिळण्यासाठी मी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त साठा देवगड तालुक्याला उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी केले .आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात होत असलेल्या कोरोना च्या वाढत्या आकडेवारी चा आढावा मंगळवारी देवगड तहसीलदार कार्यालय येथे घेतला, यावेळी देवगड तालुक्यात आरोग्य विभागाची 65% पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी तात्काळ शिक्षण व आरोग्य सभापती यांना देवगड आरोग्य विभागाचा आढावा घेण्यास सांगितले. देवगड, वैभववाडी व दोडामार्ग हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय दुर्गम तालुके असून यात काम करताना आरोग्य यंत्रणेला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.

आरोग्य सभापती डॉक्टर अनिषा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यात देवगड तालुका आरोग्य विभागाची आज महत्त्वपूर्ण बैठक देवगड तहसील कार्यालयाच्या सभागृहात झाली यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर व्हि.डी.नांदरेकर जिल्हा अधिकारी प्रशांत सवदे, नायब तहसीलदार जी के सावंत, नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेवक योगेश चांदोस्कर, नगरसेवक उमेश कनेरकर, नगरसेवक संजय तारकर, नगरसेवक बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे उपस्थित होते.

कोविड सेंटर करण्यासाठी देवगड कॉलेज यांनी असमर्थता दर्शवली त्याबद्दल सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच ज्या भागांमध्ये कोविड चे रुग्ण वाढत आहेत तो भाग कंटेनमेंट झोन करावा याबाबतही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली काही ठिकाणी कोविड रॅपिड टेस्ट सुद्धा करणे अत्यावश्यक आहे याबद्दल सुद्धा सभागृहांमध्ये सहमती दर्शविण्यात आली त्यानुसार देवगड तालुक्यात लवकरात लवकर महत्त्वाच्या ठिकाणी रॅपिड टेस्ट आणि कंटेनमेंट झोन करण्यात येतील असेही यावेळी ठरवण्यात आले.

गर्दीवर आळा बसावा यासाठी पडेल कॅन्टीन आणि देवगड या ठिकाणी लोकांची रॅपिड टेस्ट करावी अशी सूचना सभापती रवी पाळेकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी कोंडके यांना केली यावेळी कोंडके यांनी देवगड मांजरेकर नाका येथे कोविडची रॅपिड टेस्ट येत्या दोन दिवसात चालू करणार असल्याचे सांगितले परंतु पडेल येथे रॅपिड टेस्ट चालू करता येणार नाही यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अपुऱ्या कर्मचारी वर्गाचे कारण पुढे केले.

कोविड सेंटर साठी जागा अपुरी पडत असल्यामुळे आज जिल्हा आरोग्य सभापती यांनी नायब तहसीलदार, नगराध्यक्ष यांच्या सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची पाहणी केली त्यात 28 खोल्या असून 150 बेड राहतील अशी व्यवस्था आहे वसतिगृहाचे उर्वरित काम येत्या दोन दिवसात पूर्ण करून इमारत आरोग्यखात्याच्या ताब्यात दिली जाईल अशी माहिती नायब तहसीलदार जी.के.सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − fifteen =