You are currently viewing वेंगुर्ला डेपो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना चा मागच्या वाटेचा मार्ग ठरू शकतो – बनी नाडकर्णी

वेंगुर्ला डेपो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना चा मागच्या वाटेचा मार्ग ठरू शकतो – बनी नाडकर्णी

सध्याच्या स्थितीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिंधुदुर्गाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे, त्यात वेंगुर्ला डेपो मध्ये कायम स्वरूपी डेपो मॅनेजर ची नेमणूक न केल्यामुळे तिथली स्थिती रोजच्या रोज अजूनच बिकट होत आहे. संपूर्ण अंदाधुंदी सुरू असून, अनेक कामगारांना अजून लस पण दिली गेलेली नाहीं, त्यात अनेक कामगारांचा निगेटिव्ह रिपोर्ट पण त्यांच्या कडे नाही. ( शासनाच्या आदेशा प्रमाणे )
या मनमानी कारभारामुळे इतर कामगारांचा तसेच प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. त्यात परत जास्त कमाई होण्या साठी गोव्याला जाणाऱ्या फेऱ्या पण वाढवल्या गेल्या आहेत, त्यामुळे बस ड्राइवर, कंडक्टर पासून ते प्रवाश्यां पर्यंत सगळ्यांचा जीव धोक्यात घातला जात आहे
आधीच गोवा राज्यात अनेक रुग्ण सापडत असून कामगारांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन दबावाखाली काम करून घेतले जात आहे
गाव तिथे एस.टी. असल्यामुळे आता जरी किती ही कर्फ्यू गावात लावला तरी एस.टी. मुळे या रोगाचा प्रसार सहज होऊ शकतो.
लवकरात लवकर एस.पी आणि जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन या गोष्टीची शहानिशा करायची विनंती करणार आहे, तसेच तहसीलदार आणि नगराध्यक्ष ह्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी  सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =