कोलगाव येथील युवकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

कोलगाव येथील युवकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडी
कोलगाव येथील युवकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११च्या सुमारास घडली. रामचंद्र रविंद्र तथा मयुर चौगुले (२५, रा. कोलगाव नाईकबाग ) असे त्याचे नाव असून पोटात दुखत असल्याने गोळ्या आणण्यासाठी तो मेडिकलमध्ये गेला असता तिथेच तो खाली कोसळला व अत्यवस्थ झाला. मित्रांनी त्याला येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्याचे दुर्दैवी निधन झाले होते. याबाबतची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कोलगाव गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा