स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतल्या समस्या
आंबोली
जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनी मंगळवारी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी पंचायत समिती सभापती निकिता सावंत,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे आदी उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी आंबोली आरोग्य केंद्रातील डॉ. महेश जाधव,डॉ.अदिती पाटकर यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आंबोली सरपंच गजानन पालेकर,गुलाबराव गावडे, चौकूळ सरपंच सुरेश शेटये अंगणवाडी सुपर वायझर विद्या कोटगी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर,ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहीराम, आरोग्य सहाय्यक एस सोळंके आदी उपस्थित होते. आंबोलीत आतापर्यंत १०३ कोरोना बाधित झाले असून सध्या ९ बाहेर उपचार घेत आहेत तर ९ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत अशी माहिती यावेळी डॉक्टर जाधव यांनी दिली.