You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर ट्रकला अपघात…

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर ट्रकला अपघात…

झाराप येथील घटना; जीवित हानी नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान…

कुडाळ

साईड पट्टीचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट संरक्षक कठड्यावर धडकल्याने अपघात झाला.ही घटना काल रात्री उशिरा मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडली.दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातग्रस्त कंटेनर रंगाचे बॉक्स घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता.झाराप ब्रिजवर साईड पट्टी चा अंदाज न आल्याने त्याला अपघात घडला.दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twenty =