You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच चा पुणे स्नेह मेळावा थाटात पार पडला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच चा पुणे स्नेह मेळावा थाटात पार पडला

*अभिनय ज्योतिष कार्यशाळा व काव्यवाचनामुळे स्नेह मेळाव्यात आली रंगत*

 

पुणे :

जागतिक पुणे स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अभिनय ज्योतिष कार्यशाळा व काव्य वाचन यामुळे मजा आली. गायकांनी गाणी गायिली. पण आरोग्य कार्यशाळेसाठी वेळ मिळाला नाही. पुणे स्नेहमेळाव्याचे देखणे आयोजन केले होते. अभिनय कार्यशाळेचे मेळाव्याची सुरुवात झाली. गायक गायिका यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. कविता, गझल आणि खास लावणी सादरीकरणाने रसिक श्रोते सुख्यात डुबले. मिरचीची जोड असलेला खमंग पुणेरी समोसा खाऊन तृप्तीचा ढेकर देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली.

शारारिक व मानसिक आरोग्य चांगले असेल तरच साहित्य लिहू शकाल. साकव्य समूह लवकरच नाशिक व पुणे येथे *मोफत* आरोग्य मेळावा घेत आहोत. डॉ. चिदानंद फाळके यांनी अक्युप्रेशरद्वारे व आहारात बदल करून हजारो रोगी बरे केले आहेत. मेळाव्यात देखील ते मोफत मार्गदर्शन करतील. त्यांच्या बरोबर सहायक म्हणून मी असेल. सोबत ना नफा ना तोटा तत्वावर पंचगव्य औषधे दिली जातील. हे सगळे करायचे आहे. पुढे रोजगार मेळावा घेण्याचे योजिले आहे , त्या साठी बराच खर्च येईल.

आपण सर्व कार्यशाळा मोफत घेत आहोत. त्यातून दर्जेदार कवी कवयित्री घडत आहेत. विभागवार स्नेह मेळावे देखील मोफत घेत आहोत. स्नेह मेळाव्यात मोफत दर्जेदार पुस्तके देण्याचे चालू केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांनी समूहाचे हितचिंतक सदस्य व्हावे अशी विनंती करतो.

साकव्य आपल्या सभासदांसाठी सदैव उपयुक्त उपक्रम राबवत असते. साहित्यिक क्षेत्राबरोबर व्यावसायिक मार्गदर्शन आणि नोकरी (रोजगार) मिळवून देण्यासाठी यशस्वी सहकार्य आणि मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित आरोग्य तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शन, बालविकास उपक्रम आणि साहित्यातील विविध प्रकारात कुशल मार्गदर्शन करीत आपले वेगळेपण जपण्याचा साकव्य सदैव प्रयत्न करत असते. या सर्व उपक्रमांचा आपणा सर्वांना लाभ घेता यावा यासाठी आपण साकव्यचे हितचिंतक होऊन अवश्य हातभार लावावा. रुपये १००१/- मात्र वर्गणी भरून आजीवन हित चिंतक व्हावे असे आपणास आवाहन रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.

प्रत्येक सदस्याला अभिमान वाटेल अशी आपली व समूहाची वाटचाल सुरू आहे.

*गर्वाने बोला की*

*मी*

*साकव्य सदस्य आहे*.

*जागतिक ‘साकव्य’ संस्थेचे हितचिंतक सभासद व्हा!*

हितचिंतक सभासदत्व फी रु. १००१/-/- (रुपये एक हजार एक मात्र).

रक्कम आपण ‘साकव्य’ च्या खालील अकाउंट नंबरवर भरावी.

 

Sahitya Kala Vyaktitwa Vikas Manch, Nashik

HDFC Bank

Branch : Bytco point, Nashik Road, Nashik.

Account Number: 50200071978287

Account Type: Saving

IFSC Code : HDFC0000456

आपलाच,

पांडुरंग कुलकर्णी,

प्रधान ‘साकव्य’ सेवक

9321218324 / 7769055883

विलास कुलकर्णी

जनसंपर्क अधिकारी

7506848664

 

*पुणे स्नेह मेळावा*

 

पुणे स्नेह मेळाव्याचा

काय वर्णू थाटमाट

दारी मंडप छानसा

उगवली केलेची पहाट l

 

देखणे आयोजन

नव्हती कसली कमी

अभिनय कार्यशाळेने

सुरुवात झाली नामी l

 

होरापंडीत मयुरेश यांनी

विषय निवडला खास

वैवाहिक सुखाचा दिला

कानमंत्र हमखास l

 

गायक गायिका यांनी

मंत्रमुग्ध केले सकलास

काव्यवाचना नंतर गझल

लावणीचा लावण्य विलास l

 

पत्रकार कुणी चित्रकार

अभिनेत्री व अभिनेते

कवी कवयित्री सगळे

सौख्यात डुंबले होते l

 

खमंग पुणेरी समोसा

त्याला जोड मिरचीची

रुचकर स्वादिष्ट पेढे

तृप्ती झाली रसनेची l

 

आरती करून शिवबाची

झाली सांगता सोहळ्याची

कायम स्मरणात राहील

जादू ह्या स्नेहमेळाव्याची l

 

विलास कुलकर्णी

(आप्पा महाराज )

मीरा रोड

 

प्रतिक्रिया व्यक्त करा