You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यातील कंटेन्मेंट झोन..

वेंगुर्ला तालुक्यातील कंटेन्मेंट झोन..

सिंधुदुर्गनगरी

वेंगुर्ले तालुक्यात 29 ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. मौजे आरवली – टेंबवाडी येथील परिसर हा दिनांक 22 एप्रिल पर्यंत, मौजे आसोली – न्हैचीआड येथील परिसर हा दिनांक 22 एप्रिल पर्यंत, मौजे आरवली- सुतारवाडी येथील परिसर हा दिनांक 22 एप्रिल पर्यत, मौजे मठ- सिध्दार्थनगर येथल परिसर हा दिनांक 22 एप्रिल पर्यंत, मौजे तुळस- बेहेरेवाडी येथील परिसर हा दिनांक 22 एप्रिल पर्यंत, मौजे आडेली- भटवाडी येथील परिसर हा दिनांक 23 एप्रिल पर्यंत, मौजे उभादांडा – कांबळीवाडी येथील परिसर हा दिनांक 23 एप्रिल पर्यंत, मौजे वजराट – परबवाडी येथील परिसर दिनांक 23 एप्रिल पर्यत, मौजे वजराट-देवसूवाडी येथील परिसर हा दिनांक 23 एप्रिल पर्यंत, मौजे वेतोरे – देवूळवाड येथील परिसर हा दिनांक 23 एप्रिल पर्यंत, मौजे मठ- बोवलेकरवाडी येथील परिसर हा दिनांक 25 एप्रिल पर्यंत, मौजे आरवली- टेंबवाडी येथील परिसर हा दिनांक 25एप्रिल पर्यंत, मौजे उभादांडा -भडेमळा येथील परिसर हा दिनांक 25 एप्रिल पर्यंत, मौजे दाभोली -कांदळकरवाडी येथील परिसर हा दिनांक 23 एप्रिल पर्यंत, मौजे आडेली- कामळेवाडी येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे उभादांडा- नमसवाडी येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे खानोली येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे परुळे- बाजारवाडी येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे आसोली -जोसोली येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे आडेली -गांवठाणवाडी येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत , मौजे आडेली -कामळेवीर येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यंत, मौजे खानोली- आंबेसवाडी येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यंत, मौजे होडावड -जाधववाडी येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे कुशेवाडा- देऊळवाडी येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यंत , मौजे अणसुर धरमगावडेवाडी येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यंत, मौजे आडेली – भंडारगाव येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यत , मौजे आडेली – गावठणवाडी येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल पर्यंत, मौजे रेडीगांवतळ येथील परिसर हा दिनांक 27 एप्रिल पर्यंत, मौजे पाल – गोडावणेवाडी येथील परिसर हा दिनांक 28 एप्रिल2021 , रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − twelve =