You are currently viewing वैभववाडी : बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची होतेय रॅपिड टेस्ट

वैभववाडी : बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची होतेय रॅपिड टेस्ट

वैभववाडी
वैभववाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. आरोग्य विभाग, महसूल, न. पं. व पोलीस प्रशासनाच्या वतीने हीं मोहीम हाती घेण्यात आली आहे. सकाळपासून जवळपास 10 व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

यावेळी तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, मुख्याधिकारी सुरज कांबळे, आरोग्य सहाय्यक आनंदा चव्हाण, डॉ. कुंभार, आरोग्यसेविका नीलम कदम, स्वप्निल रेवडेकर, माधुरी पाटील, मंडळ अधिकारी श्री पावसकर, सचिन माईणकर, शांताराम पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भोवड आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैभववाडी तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वारंवार आवाहन करुन देखील काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात विनाकारण फिरणा-या व्यक्तीची कोरोना टेस्ट प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नये. तसेच प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करावा. प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. तालुक्यात कोवीड रुग्णांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. सक्रिय रुग्ण संख्या ही जवळपास 250 इतकी आहे. मृत्यू चे प्रमाण देखील वाढत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणे कंटेनमेंट झोन करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − three =