कणकवली नगरपंचायतीच्या कोविड सेंटरची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी…

कणकवली नगरपंचायतीच्या कोविड सेंटरची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी…

सरपंच ५० लाखांचा विम्याचा पालकमंत्र्याना विसर

कणकवली

कोरोना रोखण्यासाठी गावागावात सरपंच मेहनत घेत आहेत, त्यांना ५० लाखांचा विमा पालकमंत्री यांनी जाहीर केला, त्याचा विसर त्यांना पडला आहे. पालकमंत्री उदय सामंत झाल्या दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांना गजनीचा रोग झाला असल्याचा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली नगरपंचायतच्या नियोजित कोविड सेंटरची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, विराज भोसले, किशोर राणे, शिशिर परुळेकर, शहरअध्यक्ष अण्णा कोदे, अजय गागंण, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून पर्यटन केंद्राच्या जुन्या इमारतीत २५ बेडचे कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातील. त्यांना चांगल्या पद्धतीचे जेवणही दिले जाणार आहे. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून वेळ पडल्यास आणखी २५ बेड वाढवले जातील, तसेच देवगड नगरपंचायतच्या वतीने ५० बेड व वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने ५० बेडचे कोविड सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येत असल्याचे असे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेमडेशिवीर इंजेक्शन फक्त जिल्हा रुग्णालयातच ठेवले जात आहेत. आता पडवे मेडिकल कॉलेज, तायशेट्ये हॉस्पिटल मध्ये खाजगी कोविड सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्या रुग्णांसाठी कुठून इंजेक्शन आणायचे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व मदत होत आहे, मात्र राज्य सरकार सरकार काय करतेय? आता रुग्ण वाढत असल्याने धावाधाव चालू असली तरी आमची कणकवली नगरपंचायत आणि वैभववाडी देवगड येथे ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आवश्यक बेडची व्यवस्था आम्ही करत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा