You are currently viewing विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली – बनी नाडकर्णी

विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमांना केराची टोपली – बनी नाडकर्णी

सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्हयामध्ये एसटी प्रशासन, कामगार आणि लोकांच्या जिवाशी खेळण्याचा जणू बाजार मांडत आहे.
पंधरा दिवसा मध्ये स्वॅब टेस्ट करून निगेटिव्ह प्रमाणपत्र मिळाले तरच त्यानं ड्युटी करावयाची आहे, पण सध्या अनेक कर्मचारी हे कुठली ही टेस्ट न करता, सरळ ड्युटी वर हजर होऊन काम करत आहेत, ह्या गोष्टींवर कोणाचे ही नियंत्रण दिसत नाही आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या गोष्टीची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाही करावी.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहनला जर आपल्यापरीने निर्णय घ्यावा लागला, तर रस्त्यावर गाड्या अडवून तसेच डेपोत फिरून सगळ्यांच्या टेस्ट करून घ्याव्या लागतील, आणि त्यात कोणी पॉझिटीव्ह आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही विभाग नियंत्रकावर तसेच सर्व डेपो मॅनेजर वर राहणार असून जर का कुठल्याही हलगर्जीपणामुळे कामगारांवर तसेच प्रवाश्यांना कोरोना झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेना, या सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहे, याची नोंद घ्यावी, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी  दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा