You are currently viewing जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माडखोलातील मराठा बांधवांचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माडखोलातील मराठा बांधवांचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माडखोलातील मराठा बांधवांचे एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी

मराठा आरक्षणाच्या मागणी करिता व मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज माडखोल गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. माडखोल फणस बसस्टॉप परिसरात एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असून या उपोषणात माडखोल गावातील बांधवांनी सहभाग घेतला आहे.
उपोषणाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” “कोण सांगतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” “जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देण्यात आल्या. कुडाळ येथे होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान माडखोल गावातील मराठा समाज बांधव आपले राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत.
यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा राऊळ, माजी सरपंच संजय लाड, आनंद राऊळ, राजन राऊळ, सूर्यकांत राऊळ, कृष्णा राऊळ, योगेश लाड, अमित राऊळ, मेघनाथ राऊळ, अजित नाईक, प्रकाश देसाई, भरत राऊळ, गोविंद दळवी, विश्वास राऊळ, सुबोध राऊळ, विशाल राऊळ, निखिल गावडे, तेजस राऊळ, सुनिल राऊळ, सत्यवान राऊळ, यशवंत गावडे, कृष्णा राऊळ, विनायक राऊळ, स्वप्निल लातये, सुरज लातये, आत्माराम लातये, विजय बंड, नामदेव राऊळ, बापु राऊळ, लखन आडेलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 15 =