You are currently viewing कोकणी माणसांची बदनामी करणा-या मुख्य अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी….

कोकणी माणसांची बदनामी करणा-या मुख्य अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी….

संगमेश्वर – मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण आरवली ते वाकेड दरम्यान रखडलेल्या कामासंदर्भात पाठपुरावा करत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता ए.श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कामाबद्दल न बोलता थेट कोकणी माणसाला दोष देत रखडलेल्या कामाला कोकणी माणूसच जबाबदार असल्याचा आरोप केला याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातील महामार्गाचे १५४ प्रकल्प रखडले आहेत राज्य सरकार केंद्र सरकारला मदत करत नसल्याचा आरोप श्रीवास्तव यांनी केला.

इतर राज्यातला पैसा कररुपाने महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे या पैशावर महाराष्ट्रातील जनता मजा मारत आहे.कोकणी माणसं स्वार्थी आहेत. सुरु असलेल्या मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाला सहकार्य करत नाहीत फक्त ब्लॅकमेल करतात असा दोष देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अपयशाचे खापर कोकणी माणसावर फोडून मुख्य अभियंता मोकळे झाले.

मुख्य अभियंत्यांच्या गंभीर आरोपानंतर येडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना निवेदन देत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

येडगे यांच्या मंत्रालयातील गुन्हा दाखल करण्याच्या मागणीची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी उपसचिव ( गृह ) यांना कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत सदरचा मागणी अहवाल संगमेश्वर पोलिस ठाण्यात धडकताच संगमेश्वर पोलिसांनी येडगे यांचा जबाब नोंदवून घेत सदर प्रकरण कार्यवाहीसाठी सरकारी विज्ञीज्ञांकडे पाठवले आहे सरकारी विधिज्ञ याप्रकरणी कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई करता येईल या बाबी तपासणार आहे मात्र येडगे यांनी आपली भूमिका लावून धरत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत येडगे यांनी महामार्ग चौपदरीकरण प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेला जोडूनच मुंबई उच्च न्यायालयात आपण कोकणी माणसांच्या बदनामीचा मुद्दा मांडणार असल्याचे येडगे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =