हायप्रोफाइल राडा; नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं

हायप्रोफाइल राडा; नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पाठलाग करत तिला व तिच्या मित्राला मारहाण करणाऱ्या पती आणि त्याच्या मित्रांविरोधात पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीनं पत्नीला एका मित्राबरोबर आलिशान हॉटेलमध्ये पकडल्यानंतर बेदम मारहाण केली होती. नगर रस्त्यावर असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.

उच्च वर्गातील हे दाम्पत्य पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. आकाश मान हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी होता. मात्र राजीनामा देऊन तो युपीएससीची तयारी करत आहे. तर त्याची पत्नी ही बँकर असल्याची माहिती मिळाली आहे. आकाश याला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून तो पत्नीवर पाळत ठेवून होता. त्यानुसार एक दिवस आकाशने पत्नीचा पाठलाग केला आणि एका आलिशान हॉटेलमध्ये त्यानं मित्रासह पकडले. यानंतर या हॉटेलमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यात पत्नीला बेदम मारहाण करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर तिच्या मित्रालाही बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी आकाशबरोबर त्याचे मित्रही होते.

महिलेने या प्रकरणी पतीच्या आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार महिला तिचा मित्र असलेल्या जगप्रकाश पांडे यांच्याबरोबर या हॉटेलमध्ये उतरली होती. महिला मित्राच्या खोलीमध्ये सामान ठेवण्यासाठी गेली त्याचवेळी तिचा पती तिथं मित्रांबरोबर आला. त्यानंतर त्यानं महिलेला बेदम मारहाण केली. तिच्या मित्राने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. पतीच्या मित्रांनीही मारहाण केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी या राड्याबाबत माहिती आणि तक्रार मिळाल्यानंतर सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पण हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर महिलेचा पती आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा