You are currently viewing रेमडीसीवीर इंजेक्शनच्या वापरात सुसूत्रता येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा..

रेमडीसीवीर इंजेक्शनच्या वापरात सुसूत्रता येण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा..

इंजेक्शनच्या वापराबाबत पारदर्शकता यावी व जनतेस सुलभपणे उपलब्ध व्हावे यासाठी रेमडीसीवीरचा प्राप्त साठा, लाभार्थी यादी, शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल तपशील जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करावा…

मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पणदूर :

राज्यासह देशात सद्यास्थित कोरोना विषाणू प्रादुर्भाव जोर धरू लागला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना प्रभावित रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे असे चित्र आहे. कोरोना विषाणू लढाईत महत्वाचे व प्रभावशील असणारे रेमडीसीवीर या इंजेक्शनचा तुटवडा जिल्हातील रुग्णांना भासू लागला आहे अशी माहिती मिळते. ज्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी “ रेमडीसीवीर ” या इंजेक्शनचा काळा बाजार होवून जनतेला लुटण्याचे प्रकार समोर आलेले आहेत. यामुळे गोरगरीब जनतेला इंजेक्शन अभावी प्राणास मुकावे लागले आहे अशीही काही उदाहरणे मिडियामधून समोर आलेली आहेत. यासारखे प्रकार आपल्या जिल्हात होवू नये यासाठी ज्याप्रकारे आपणाकडून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत दैनंदिन तपशील जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसिद्धी दिली जाते अगदी तशाच प्रकारे रेमडीसीवीर या इंजेक्शनच्या आरोग्य विभागाकडील वापराबाबत पारदर्शकता यावी व जनतेस सुलभपणे उपलब्ध व्हावे, या इंजेक्शन अभावी जिल्ह्यात कोणत्याही रुग्णांस प्राणांस मुकावे लागू नये यासाठी रेमडीसीवीर या इंजेक्शनचा प्राप्त साठा, लाभार्थी यादी, शिल्लक साठा याबाबतचा दैनंदिन अहवाल तपशील जिल्हा प्रशासनाकडून दैनंदिन प्रसिद्ध करावा अशी मागणी मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा