बांदा
जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा व एकलव्य अकॅडमीचा विद्यार्थी कुमार मयुरेश रमेश पवार याने कोल्हापूर विभाग अंतर्गत माहे फेब्रुवारी २०२१मध्ये आॉनलाईन अबॅकस अॅपद्वारे घेण्यातआलेल्या
राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश प्राप्त करून ट्रॉफी व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
आॅनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत मयुरेश पवार ने पाच मिनिटात 100 पैकी 80 गणिते अचूक सोडवून Runner up 2 येण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत गणिताची काठीण्य पातळी अतिशय कठीण असून देखील मयुरेश पवार ने आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपली नंबराची परंपरा कायम ठेवली. यापूर्वी झालेल्या अनेक स्पर्धेत त्याने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली असून गेल्यावर्षी गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ही स्पर्धेतही मयूरेशने सुयश प्राप्त केले होते .
मयुरेश पवार याला एकलव्य अकॅडमीच्या च्या शिक्षिका स्नेहा केसरकर /पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मयुरेश ने मिळवलेल्या यशाबद्दल सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,बांदा सरपंच अक्रम खान,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, केंद्रप्रमुख संदीप गवस , ग्रामपंचायत सदस्या उमांगी मयेकर , मुख्याध्यापिका सरोज नाईक ,शिक्षक जे डी. पाटीलआदी उपस्थित होते. मयुरेशने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.