सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब वाढदिवस अभिष्टचिंतन..
सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब वाढदिवस अभिष्टचिंतन..

सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब वाढदिवस अभिष्टचिंतन..

♦शिवसेना….कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर अखंडपणे तेवत असलेला दीपस्तंभ… त्याच दिपस्तंभाची एक वात म्हणजे कट्टर शिवसैनिक आणि सावंतवाडी संपर्क प्रमुख शैलेश परब. शिवसेनेच्या मंध्यंतरीच्या पडत्या काळात अनेकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यशस्वीपणे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली त्यातील आघाडीचे नाव म्हणजे शैलेश परब.

♦२०११ मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख पद स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटना बांधणीवर व संघटना वाढीवर विशेष लक्ष दिले आणि शिवसेनेला मतदारसंघात उभारी दिली. गावागावात जाऊन तिन्ही तालुक्यात शाखा बांधणी करण्याचे महत्त्वाचे काम शैलेश परब यांनी शिवसैनिकांकडून करून घेतले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने तळागाळातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केल्याचे दिसून येते.

♦सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचा संपर्क दांडगा असल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर होते. परंतु दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी मधून बाहेर पडत शिवसेना प्रवेश केल्याने केसरकर हे उमेदवारीचे दावेदार बनले परंतु कोणतीही नाराजी न व्यक्त करता पक्षाचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला, व शिवसेनेचा खासदार, आमदार निवडून येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, आणि एक कट्टर शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले.

♦उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. सावंतवाडीत रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, दोडामार्गमध्ये बाबुराव धुरी, संजय गवस, वेंगुर्ल्यात बाळा दळवी असे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते घडविले. आजही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ते संपर्क प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत.

♦अशा या कट्टर शिवसैनिक शैलेश परब यांचा आज वाढदिवस…. संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रतिक्रिया व्यक्त करा