You are currently viewing कोविड – 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम व वॉर्ड नियंत्रण समिती कार्यान्वीत

कोविड – 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम व वॉर्ड नियंत्रण समिती कार्यान्वीत

सिंधुदुर्गनगरी

जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग के.मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्‍हयात कोविड-19 प्रतिबंध करणेसाठी तसेच प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्‍हयातील ग्रामीण भागात ग्राम नियंत्रण समिती करिता गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच शहरी भागात वॉर्ड नियंत्रण समिती करिता मुख्‍याधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांना नोडल अधिकारी म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे.

या नोडल अधिकारी यांनी त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोरोना विषयक प्राप्‍त तक्रारी, तक्रारींचे पर्यवेक्षण, तसेच प्राप्‍त तक्रारींचा निपटारा करणेचा आहे. ग्रामीण भागातील नोडल अधिकारी यांचे कामकाजावर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद व शहरी भागातील नोडल अधिकारी यांचे कामकाजावर जिल्‍हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन विभाग यांनी जिल्‍हा नोडल अधिकारी म्‍हणून कामकाज पहाणेचे आहे.

 ग्राम नियंत्रण समिती व वॉर्ड नियंत्रण समिती  यांनी जिल्‍हयाबाहेरुन येणाऱ्या प्रत्‍येक नागरिकांची आरोग्‍य तपासणी व आरोग्‍य चाचणी झाली अगर कसे? याकरिता आरोग्‍य विभागाच्‍या समन्‍वयाने कामकाज करावे. Home Isolation मध्‍ये असलेले नागरिक नियमांचे पालन करीत आहेत अगर कसे? व सदर नागरिक हे बाहेर फिरणार नाहीत यावर देखरेख ठेवावी. गावात,  प्रभागात रहिवाशी असलेल्‍या लोकांचे आरोग्‍य विभागामार्फत वेळोवेळी आरोग्‍य तपासणी करावी. (Active Surveillance) ज्‍या लोकांना कोरोना विषयक लक्षणे दिसून येतात त्‍या नागरिकांची RTPCR तपासणी करुन घ्‍यावी. गावात, वॉर्ड मध्‍ये कंटेन्‍टमेंट झोन जाहीर झाल्‍यानंतर त्‍याच्‍या प्रभावी अंमलबजावणीकरिता ग्राम नियंत्रण समिती व वॉर्ड नियंत्रण समितीने महसूल, पोलीस, आरोग्‍य विभागाशी समन्‍वयाने काम करावे. रुग्‍णांच्‍या संपर्कातील सर्व नागरिकांची (High Risk/Low Risk) आरोग्‍य विभागाच्‍या समन्‍वयाने  RTPCR तपासणी करुन घ्‍यावी, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा