ग्रामपंचायत निवडणूक मतदाना दिवशी आठवडी बाजार बंद

ग्रामपंचायत निवडणूक मतदाना दिवशी आठवडी बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक 2020 ची निवडणूक प्रक्रिया सूरू आहे. यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. या मतदाना दिवशी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड आणि वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे आठवडी बाजार असल्याने मतदान पक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीत पार पाडावे यासाठी या दोन्ही गावांमधील दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा