You are currently viewing बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया

बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया

जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत यांचा पाठपुरावा

कणकवली :

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर कणकवली तालुक्यातील विकास कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी दिली.

कणकवली तालुक्यातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणण्यात आला आहे, महिंद्र सावंत यांच्या प्रयत्नातून मंजूर करून आणलेल्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया सध्या सुरू झाल्या आहेत, तसेच काही कामाच्या निविदा पुढील आठवड्यात सुरू होतील,यावेळी अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व कणकवली साठी विकासनिधी कमी पडू  देणार नाही असे सांगितले,

निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पुढीलप्रमाणे::

1)सुभाषणगर(कनेडी)कुंभवडे रस्ता

2)कणकवली नागवे करंजे

3)कणकवली जाणवली तरंदले भरणी चाफेड साळशी

तसेच पुढील आठवड्यात  निविदा प्रक्रिया सुरू होणारी कामे—–

कणकवली कनेडी फोंडा उंबर्डे रस्ता, दिगवळे रांजणवडे रस्ता

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 5 =